बीड कोरोना ब्रेकिंग! आज पुन्हा रुग्णसंख्या वाढली
काळजी घ्या, कोरोनाचा संसर्ग टाळा!
रुग्ण संख्येत समाधानकारक घट पडत असताना आज मात्र रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रोजच्या तुलनेत आज कोरोना चाचण्या अधिक प्रमाणात झाल्या आहेत.
रूग्णवाढ घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.
आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज केवळ 43 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रूग्णसंख्या कमी प्रमाणात येत असली तरी निष्काळजीपणा नको असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.