सिनेमा,मनोरंजन

कूली नंबर १ चित्रपटाने वरुण धवनला बहाल केला ओव्हर अकटिंगचा किताब

कूली नंबर- 1 रिव्हिव्ह

एक साधं कथानक, कमालीची डायलॉग डिलीव्हरी, धम्माल अशी कॉमेडी, आजही जिभेवर असलेली सुपरहिट गाणी, गोविंदा-करिष्माच्या भन्नाट नृत्य, अभिनयाने 1995 साली प्रदर्शित झालेला ‘कुली नं. 1’ हा एक प्रचंड गाजलेला चित्रपट होता. हा चित्रपट डेव्हिड धवनच्या स्लाईस ऑफ लाइफ कॉमेडीचा उत्तम नमुना होता. मात्र नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर 1’ च्या रीमेकमध्ये आपल्याला डेव्हिड धवनचा पूर्वीचा झलक पाहायला मिळत नाही. या चित्रपटात मुख्य भूमिका त्यांचा मुलगा वरुण धवन आणि सारा अली खान यांनी साकारली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

हा चित्रपट म्हणजे अर्धवट भाजलेल्या अर्ध्या कच्च्या भाकरीसारखा असल्याचे भासत आहे. हा चित्रपट पूर्णतः भरकटलेला आहे. पण दुर्दैवाने डेव्हिड धवन यांचा, हा चित्रपट अर्ध्या भाजलेल्या केक सारखा आहे. ज्याला हा पदार्थ मी बनवलाय हे सांगायलाही भिती वाटावी. यातील काही डायलॉग सोडले, तर बाकीचा सर्व चित्रपट भरकटलेला आहे. त्यामुळे दर्शकांसाठी फारच रटाळवाना ठरतो. यावर आता दर्शकांच्या प्रतिक्रियाही यायला सुरू झाल्या आहेत. दर्शकांच्या प्रतिक्रियांमध्ये या चित्रपटाची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. या चित्रपटाने वरून धवनला ओव्हर अकटिंगचा किताब बहाल केला आहे तर सारा आली खान या चित्रपटात केवळ महागातले कपडे परिधान करून बाहुलीप्रमाणे मिरवताना दिसत आहे.

साराचा आणि अभिनयाचा कसलंही संबंध नसल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाच्या कथेत काहीच नवीन नाही. गोव्यातील हॉटेलचा मालक रोझारियो (परेश रावल) हा जयकिशन (जावेद जाफेरी) या मॅचमेकरचा अपमान करतो. त्यामुळं तो श्रीमंत रोझारियोची मुलगी सारा (सारा अली खान) हीचं लग्न स्टेशनवर कुलीचं काम करणाऱ्या राजू (वरूण धवन) सोबत लावून देतो. त्यामध्ये गाण्याचे रीमेक, सीन रिमेक आणि डान्स रिमेक आहेत. या चित्रपटातील बऱ्यापैकी सीन, हावभाव हुबेहुब कॉपी केलेले आहे.

स्वतः च्याच चित्रपटाचा रिमेक केला तर कॉपी करायला काही मर्यादा राहत नाहीत. या चित्रपटातील संवाद पूर्णपणे निराश आहेत. या चित्रपटाकडून जेवढी अपेक्षा होती तिथपर्यंत या चित्रपटाला पोहचता आलं नाही. यामध्ये गोविंदाच्या उत्स्फूर्ततेची आणि जादूची कमी जाणवली तर करिष्माच्या अदाकारीची देखील उणीव भासली, कादर खानची पोकळी भरून काढण्यात चित्रपट अयशस्वी ठरला आहे. एकंदरीत नवीन कूली नंबर 1 पूर्णतः सुपर बकवास म्हणायला हरकत नाही.