क्रीडा

क्रिकेट पंडितांनी केले कर्णधार अजिंक्यच्या नेतृत्वाचे कौतुक

28 Dece :- शास्त्रींच्या विराट सेनेचा ऑस्ट्रलिया दौऱ्यावर पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सुरू आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताने केवळ १९५ धावांवर बाद केले. भारताच्या या कामगिरीबद्दल अनेक क्रिकेट पंडितांनी आनंद व्यक्त केला आहे. या सर्वांमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले जात आहे तर क्रिकेटप्रेमींनी सुद्धा सोशल मीडियावरून अजिंक्य रहाणेच्या कामगिरीला नावाजले आहे.


वीरेंद्र सेहवाग
‘अजिंक्यने गोलंदाजीत उत्तम बदल करत क्षेत्ररक्षकांनाही योग्य ठिकाणी उभे केले होते. गोलंदाजांमध्ये याचा चांगला परिणाम झाला. बुमराह आणि सिराज यांनी उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 195 धावांवर बाद करणे विशेष आहे. सामन्यात आघाडी घेण्याचे काम आता पूर्णतः फलंदाजांवर आहे.’
शेन वॉर्न
अजिंक्यने उत्तम कामगिरी केलेली आहे.’ या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद केल्यानंतर १ बाद ३६ धावा केल्या आहेत.


व्हीव्हीएस लक्ष्मण
‘भारताने आज उत्तम खेळ केला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावित केले, तर पदार्पण करणाऱ्या दोन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. अजिंक्यने देखील उत्तम कामगिरी केली असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघ ॲडीलेड येथील पराभवाला मागे टाकत उत्तम पुनरागमन करत आहे.