बीड

क्रिकेटच्या देवाला उमगलं, अखेर काय चुकतंय पृथ्वीचं

पृथ्वीने बॉलचा अंदाज घेऊन त्या दृष्टीने खेळण्याची तयारी करावी!

28 Dece :-भारतीय संघाचा प्रतिभावंत युवा खेळाडू पृथ्वी शॉ सध्या मैदानात संघर्ष करताना दिसत आहे. प्रतिभावंत असताना देखील पृथ्वी शॉ च्या बॅटमधून धावा बरसत नाहीत. पृथ्वीचं नेमकं काय चुकतंय हे क्रिकेटच्या देवाला उमगलं आहे. सचिन म्हणतो, पृथ्वी शरीरापासून दूर राहून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच अॅडलेड टेस्टमध्ये पृथ्वी थोड्या उशिरा चेंडू खेळत असल्याचे दिसलं. पृथ्वीच्या बॅकलिफ्टबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, “अशा चुका जेव्हा होतात तेव्हा फलंदाजाच्या मनात एकाच वेळी अनेक विचार सुरु असतात किंवा बॅट्समन शॉर्ट पीच बॉलची अपेक्षा ठेवत असतो किंवा त्याची वाट पाहत असतो”.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बॉल खेळत असताना पृथ्वीला आपले हात शरीराच्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. त्याची बॅकलिफ्ट चौथ्या स्लिपमधून येत आहे, हे होणं अपेक्षित नाहीय. पृथ्वीची बॅट बॉलच्या दिशेने मायक्रो सेकंद जरी लेट आली तरी बॅट आणि पॅडच्यामध्ये विशिष्ट अंतर पडतं आणि साहजिकच बॉल त्याच गॅपमधून स्टम्पकडे जातो, अशी खास टिप्स सचिनने पृथ्वीला दिलीय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वी थोड्या उशीराने बॉलला खेळण्याचा प्रयत्न करतोय, हे माझ्या निदर्शनास आलं आहे. माझ्या म्हणण्यानुसार पृथ्वीने बॉलचा अंदाज घेऊन त्या दृष्टीने खेळण्याची तयारी करावी, असं सचिन म्हणाला,

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत पृथ्वी त्यावेळी बोल्ड झाला जेव्हा त्याचा फ्रंटफूट मूव्हमेंट ठीक नव्हती. फलंदाजासोबत त्यावेळी असं घडतं ज्यावेळी त्याच्या मनात एकापेक्षा अधिक विचार सुरु असतात किंवा तो शॉर्ट पीच बॉलची अपेक्षा करत असतो, असं सचिन म्हणाला. सचिनच्या या सल्ल्यांना पृथ्वीने गांभीर्यानं घेतलं तर नक्कीच पृथ्वी पुन्हा एकदा आपल्या पहिल्या फॉर्मात परतेल हे नक्की.