सिनेमा,मनोरंजन

रणबीर म्हणतो, ‘तो’ आडवा आला नाहीतर आमचं वाजलं असतं

मी अजून लहान आहे. लग्नासाठी तयार नाही- आलिया

28 Dece :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर आणि तितकीच लोकप्रिय असणारी अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या अफेर्सच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहेत. रणबीर-आलिया हे बॉलीवूडमधील लाडकं कपल आहे असे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

जवळजवळ 2 वर्ष हे दोघं एकमेंकांना डेट करत आहेत. त्यांनीही आपलं प्रेम चाहत्यांपासून लपवून ठेवलेलं नाही. हे कपल खुल्लमखुल्ला पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. त्यामुळे त्यांचं लग्न कधी होणार असा प्रश्न चाहत्यांना कायमच सतावत असतो.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूरने या प्रश्नाबाबत खुलासा केला. ‘मी आलिया भट्टशी लग्न करायला तयार आहे. 2020 मध्येच मला लग्न करायचं होतं पण कोरोनामुळे सगळीच वाट लागली. आलिया भट्ट वयाने लहान असली तरी तिने कमी वयात खूप यश संपादन केलं आहे. मला तिचा अभिमान आहे’

एकीकडे रणबीर लग्नासाठी तयार आहे असं दाखवत असताना आलिया, ‘मात्र मी अजून लहान आहे. लग्नासाठी तयार नाही.’ अशी प्रतिक्रिया देत आहे. आता यांचं लग्न नक्की कधी होणार हे येणाऱ्या काळात समजेलच.