बीड

जुनी शिवसेना इज बॅक, ईडीच्या कार्यालयावर लावले भाजपचे बॅनर!

मुंबई, 28 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Goverment) नेते आणि आमदारांना एकापाठोपाठ ईडीच्या (ED notice) नोटीस मिळाल्यामुळे अखेर शिवसेना आता आपल्या जुन्या अवतारात रस्त्यावर उतरली आहे. शिवसैनिकांनी (Shivsena) थेट ईडीच्या कार्यालयावर भाजपचे बॅनर लावून एकच दणका उडवून दिला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयाला ईडीने नोटीस बजावली. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नोटीस पाठवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. एकीकडे संजय राऊत यांनी नोटीसीवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचे नावच बदलून टाकले आहे. ईडीच्या कार्यालयावर हे ‘भाजप प्रदेश कार्यालय’असं सांगत बॅनरच लावले आहे. शिवसैनिकाच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहे.

‘गेल्या दीड महिन्यांपासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना जी काही कागदपत्र हवी आहे, ती वेळोवेळी पुरवली जात आहे. यापैकी कोणत्याही अशा पत्रात भाजपचे नेते जे पीएमसी घोटाळा, HDIL प्रकरणाची नावं घेत आहेत, त्याचा उल्लेख यात केलेला नाही. भाजपचे नेते माकडाप्रमाणे उड्या मारत आहेत. ईडी आणि भाजप नेत्यांची हातमिळवणी झाली आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

‘ईडी आणि केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईक हे टोकण आहे. डिसेंबरपर्यंत भाजपची डेडलाईन होती. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी ईडीकडून प्रयत्न सुरू आहे. बायकांच्या पदराच्या आड खेळी खेळीत आहे’ असंही राऊत म्हणाले.