सिनेमा,मनोरंजन

सुशांतची हत्या की आत्महत्या हे CBI नं स्पष्ट करावं- गृहमंत्री

अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गुड उलगडलेले नाही

27 Dece :- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जून महिन्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली यावरुन राजकारण तापले होते. मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करत हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र अद्यापही याचा तपास लागू शकलेला नाही. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल केला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘सीबीआयने तपास सुरू करून आता पाच महिने उलटले आहेत. मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या घरात आढळला होता. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा सुरू झाला. त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर त्याची हत्या करण्यात आल्याचेही म्हटले गेले. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडे होती. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गुड उलगडलेले नाही.