बीड

बीड- दारुड्या पतीने पत्नीवर कत्तीने केले वार

आष्टी तालुक्‍यातील देवळाली पानाची येथे घडली घटना

26 Dece :- आष्टी तालुक्‍यातील देवळाली पानाची येथे एका दारुड्या पतीने आपल्या पत्नीवर कत्तीने वार केल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये ती जखमी झाल्याने तिच्यावर आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.जया जाधव (रा.पौंडूळ) असे जखमी महिलेचे नाव आहे.तिचा पती सुरेशला दारूचे व्यसन आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून जया ह्या मागील एक महिन्यापासून आपल्या माहेरी देवळाली पानाची येथे आल्या होत्या.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सुरेशने मद्यधुंद अवस्थेत मंगळवारी रात्री उशिरा गांच्या माहेर जाऊन जयाला उठवत तुला नांदायचे नाही का जाब विचारला.यावेळी जयाने जया यांच्या माहेर जाऊन जयाला झोपेतून उठवत तुला नांदायचे नाही का ? असा जाब विचारला.यावेळी जयाने त्याच्यासोबत यायला नकार दिल्यानंतर सुरेशने जयाच्या चेहऱ्यावर कत्तीने वार करून जखमी केले.

यावेळी जयाचा आरडाओरडा ऐकून नागरिकांनी धाव घेत तिला सुरेशपासून वाचविले.दरम्यान जखमी अवस्थेतील जयाला तिच्या भावाने आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दखल केले आहे.याप्रकरणी अंभोरा पोलिसात आरोपीविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.