बीड- चक्क पतीनेच केलं पत्नीच्या अर्धनग्न फोटोंचं सोशल मीडियावर प्रदर्शन
केज पोलिस ठाण्यात पती विरुध्द गुन्हा दाखल
26 Dece :- बीड जिल्ह्यात कधी काय घडेल याचा नेम राहिला नाही. भारतीय संस्कृतीत पती पत्नीसाठी सर्व सुख दुखाचा साथिदार असतो. पत्नीची अब्रु ही पतीसाठी जीवापाड असते. मात्र केजमध्ये पतीनच पत्नीची अब्रु चव्हाट्यावर आणल्याचा धक्कादायक प्रकार केजमध्ये घडला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
व्हाट्सअप स्टेटस वर पत्नीचे अर्धनग्न फोटो ठेऊन पत्नीच्या चुलत्याला व्हाट्सअपवर तीच फोटो पाठवून सोशल मिडियातून विनयभंग केल्याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात पती विरुध्द गुन्हा नोंद झाली आहे. केज तालुक्यातील एका तरुणीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एका तरुणांसोबत काही काळापुर्वी लग्न झाले. दि.२४ रोजी सदरील पतीने पत्नीचे अर्धनग्न लज्जास्पद फोटो पिडितेच्या चुलत्याला व्हाट्सअपवर पाठवले.
दि.२५ रोजी हेच अर्धनग्न फोटो स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवले. यामुळे पिडितेला धक्का बसला. सोशल माध्यमात लज्जास्पद फोटो व्हायरल केल्यामुळे विवाहितेची बदनामी झाली. याप्रकरणी पिडितेने थेट केज पोलिस ठाणे गाठत पती विरुध्द फिर्याद दिली.
याप्रकरणी केज पोलिस (Police) ठाण्यात आरोपी पती विरुध्द भादवि ३५४ (क) सह माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदिप त्रिभुवन हे करत आहेत.