Navneet rana - Zunjarneta live

नवनीत राणा अडचणीत; अकोल्यात तक्रार दाखल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Sept :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अकोल्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राणा यांनी एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ हा शब्द प्रयोग केल्याने दोन समाजात तेढ निर्माण केली, असा आरोप तक्रारकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जावेद जकेरिया यांनी केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या बातमीतून मुस्लिम समाजावर करण्यात आलेले आरोप व त्यातून दोन धर्मात वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला आहे. सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेसचे जावेद जाकेरिया यांनी दाखल केली.

तक्रारीनुसार, 7 सप्टेंबर रोजी रोजी सोशल मीडियावर आरोपींबद्दल व्हिडीओसह एक बातमी फ्लॅश झाली होती. राणा या राजापेठ अमरावती येथील पोलिस ठाण्यात असताना पोलिस अधिकाऱ्यांवर बरसल्या. सतत त्या ‘लव्ह जिहाद’ चा उल्लेख करत होत्या. हे प्रकरण एका बेपत्ता मुलीशी संबंधित होते. परंतु विशिष्ट हेतूने आणि दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने मुलीला अन्य धर्माच्या मुलाने पळवून नेले असल्याचा आरोप करण्यात आला होता. मुस्लिम समाजातील मुलावर कारवाई करण्यासाठी त्या पोलिसांवर दबाव आणत होत्या.

अमरावती येथे ही घटना घडली असली, तरी हे वृत्त सर्वत्र पसरले. त्यामुळे ही तक्रार दाखल करीत असल्याचे जकेरिया यांनी म्हटले आहे. हिंदू मुली मुस्लीम मुलांसोबत पळून गेल्याच्या घटना घडल्या, अशी खोटी माहिती पसरविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी खासदार राणा यांच्यावर केला आहे.

स्वतःच्या फायद्यासाठी समाजातील शांतता बिघडवण्याचे कृत्ये करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे कृत्य स्पष्टपणे दोन धर्म आणि समुदायांमध्ये वैर निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे. त्यामुळे गुन्हा नोंदवून खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती तक्रारीतून जकेरिया यांनी केली आहे.

The post नवनीत राणा अडचणीत; अकोल्यात तक्रार दाखल first appeared on Zunjarneta live.

नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक…दिला ‘हा’ इशारा…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Sept :-  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात पोलीस पत्नी वर्षा भोयर ह्या पोलिसांच्या सन्मानासाठी आक्रमक झाल्या असून त्यांनी यासाठी आंदोलनाचे पाउल उचलले असून जो पर्यंत खासदार नवनीत राणा पोलिसांची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा वर्षा भोयर यांनी दिला आहे. त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन आज आंदोलन केले आहे.

दोन दिवसांपूर्वी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला होता. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

अमरावतीच्या वर्षा भोयर यांचे पती PSI पदावर कार्यरत असून त्यांचे सासऱ्यांनी सुद्धा पोलीस खात्यात सेवा दिली आहे, त्यामुळे त्यांना पोलिसांची काय अवस्था असते हे माहिती असून म्हणून त्यांनी नवनीत राणा यांच्या विरुद्ध बंड पुकारल्याचे दिसत आहे. दोन दिवसांत नवनीत राणांनी माफी मागितली नाही तर, आपण आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा पोलिसाच्या आंदोलक पत्नीने दिला आहे. पोलिसांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुंबई किंवा दिल्लीला जाऊन आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत पोलिसाची आंदोलक पत्नी म्हणाल्या की, “नवनीत राणा आता तू माफी माग, मला मुंबईला जावं लागलं तरी जाणार, मला दिल्लीला जावं लागलं तरी जाणार, पण हे प्रकरण आता थांबणार नाही. जोपर्यंत तू माफी मागणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मी इथे बसून आमरण उपोषण करेन. तुला माफी मागावीच लागणार आहे.

तू दहावी-बारावी पास झाली आहेस, इथे जे अधिकारी येतात…, ते यूपीएससी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अहोरात्र जागरण करत मेहनत करतात. तूदेखील करोना काळात एका पोलीस अधिकाऱ्याचा ऑडिओ कॉल रेकॉर्ड करून व्हायरल केला होता. सर्वांना नियम सारखे असायला पाहिजेत, तिला कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवालही पोलिसाच्या कुटुंबियांनी विचारला आहे.

“नवनीत राणा तुझा निषेध असो, पोलिसांची हाय तुला सुखाने जगू देणार नाही. तू त्यांची बदनामी केली आहे, मी आता गप्प बसणार नाही, तू काहीही बोलली तरी मला आता फरक पडणार नाही. पण तुझ्याविरोधात आता मी अविरतपणे लढणार आहे. तू फक्त नौटंकी आहेस, नौटंकीच राहशील आणि नौटंकीच करशील” अशी प्रतिक्रियाही पोलिसाच्या पत्नीने दिली आहे.

The post नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक…दिला ‘हा’ इशारा… first appeared on Zunjarneta live.

नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात गोंधळ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Sept :- तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला, या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात धडकल्या. अमरावती शहरात आंतरधर्मीय विवाह प्रकरणात पोराशी थोडा कडक व्यवहार करा, असे मी अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी फोन केल्यानंतर त्यांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला. पोलिस सहकार्य करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यात आंतरधर्मीय विवाहानंतर तरुणीवर अत्याचार झाल्याचा आरोप भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला असून हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीला समोर आणण्याची मागणी त्यांनी केली.

पोलिस स्टेशनच्या बाहेर माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, आपल्या मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते. तेव्हा मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. पोलिसांना माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. आम्ही दलित समाजाचे म्हणून आमचे फोन रेकॉर्ड केले जात आहेत.

राणा म्हणाल्या की, त्या मुलाची रात्रीपासून चौकशी सुरू आहेत. पण, काही समोर येत नाही. मुलगी कुठे आहे. याबाबत उत्तरे दिली जात नाहीयेत. त्या मुलाच्या परिवाराला इथे पकडून आणा, एका तासात सगळे बाहेर येईल. सगळे बोलायला लागतील. शिवाय, दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम त्यांनी पोलिसांना दिला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, संपूर्ण अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण वाढत आहेत. अमरावतीत दररोज अशा घटना घडत आहेत. 15 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलींना पळवून नेले जाते आणि नंतर त्या मुलींवर अत्याचार केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

The post नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात गोंधळ first appeared on Zunjarneta live.

नवनीत राणांवर शिवसेनेची टीका; ‘सी’ ग्रेड अभिनेत्री आता फड उभा…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 Sept :- शिवसेना कालही मजबूत होती आजही मजबूत आहे. तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांचे नाक कापू. शिवसेना उपनेत्या व प्रवक्ता संजना घाडी यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य भाजप खासदार नवनीत राणा यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. संजना घाडी म्हणाल्या, नवनीत राणा कोण आहात आपण? ‘सी’ ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. हनुमान चालीसाशी आपला संबंध काय आहे. हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचे साधे उत्तर मुलाखती मध्ये आपल्याला देता आले नाही. आणि म्हणे मी हनुमान भक्त.

भाजपच्या डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितले आणि तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. घाडी पुढे म्हमाल्या, ज्या बाईला लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती. तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली वगैरे वगैरे. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत.

बाळासाहेबांचे राहिले नाहीत. पण याच मातोश्रीवर बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती. आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील. हे तुमच्यासारख्या ‘मुंबईची मुलगी’ म्हणवून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे.

पुढे राणा यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी सी-ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे. कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई. त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका. असा टोला त्यांनी लगावला.

The post नवनीत राणांवर शिवसेनेची टीका; ‘सी’ ग्रेड अभिनेत्री आता फड उभा… first appeared on Zunjarneta live.

खैरे नवनीत राणांवर संतापले! सिगारेट ओढत फोटो काढणाऱ्या महिलेने आम्हाला…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 Sept :- गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो, अशी एकेरी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना खैरे म्हणाले की, सिगारेट ओढत फोटो काढणाऱ्या महिलेने आम्हाला काही शिकवू नये, त्यांचे कपडे कसे असतात हे सर्व जनतेला माहिती आहे.

गुलाबराव पाटील अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधताना आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता यावर चंद्रकांत खैरेंनी गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे, अशा एकेरी शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. यामुळे चंद्रकांत खैरे चांगलेच संतापले आहेत. यावर बोलताना त्यांनी त्या बाईंनी आम्हाला हनुमंताची आणि रामाची भक्ती शिकवू नये असे म्हणत तिचे कपडे आणि सिगारेट ओढतानाचे फोटो पाहिल्यावर लोकांना त्या कशा आहेत हे समजले आहे अशी टीकाही खैरेंनी केली.

The post खैरे नवनीत राणांवर संतापले! सिगारेट ओढत फोटो काढणाऱ्या महिलेने आम्हाला… first appeared on Zunjarneta live.

आपण सर्वांनीच राऊतांचे अभिनंदन केले पाहिजे; नवनीत राणांचा खोचक टोला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 July :- राज्यातील जनतेच्या हिताचे सरकार हे संजय राऊत यांच्यामुळेच आले असल्याची खोचक टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरे घरी बसले असून त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

”आपण सर्वांनीच संजय राऊत यांचे अभिनंदन केले पाहिजे. मी सुद्धा त्यांचे अभिनंदन करते. त्यांच्यामुळेच राज्यात जनतेच्या हिताचे सरकार आले आहे. आता कुठे महाराष्ट्राला खरा अर्थाने न्याय मिळाला आहे. उद्धव ठाकरेंना घरी बसनवण्याचे काम संजय राऊतांनी केले आहे”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्या संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, अशी मागणी दोघांनी केली होती. तसेच मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी दोघेही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत होते.

The post आपण सर्वांनीच राऊतांचे अभिनंदन केले पाहिजे; नवनीत राणांचा खोचक टोला first appeared on Zunjarneta live.

नवनीत राणा यांच्‍या जीवाला धोका?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 July :- खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांचा हितचिंतक असणाऱ्या कथित अल्‍पसंख्‍यांक व्यक्तीने याबाबत खासदारांना पत्र पाठवून महिती दिली आहे.

“ मी आपल्या शहरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी शासकीय नोकरी करीत आहे. आपण माझ्या वडिलांची करोना काळात मदत केली होती. काही लोक आपला पाठलाग करीत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे.” असे या पत्रात नमूद आहे.

“अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयीत लोक आले आहेत. हे लोक तुमच्या घरी येऊन गेले आहेत.” असा उल्लेख देखील या पत्रात आहे. पत्राच्‍या शेवटी खुदा हाफिज, असे लिहिले आहे. खासदार नवनीत राणा या सध्‍या दिल्‍लीत असून त्‍यांची प्रतिक्रिया लगेच कळू शकले नाही. हे पत्र नवनीत राणा यांच्‍या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारीत करण्‍यात आले आहे.

The post नवनीत राणा यांच्‍या जीवाला धोका? first appeared on Zunjarneta live.

नवनीत राणांचा गंभीर आरोप; हत्या प्रकरण दाबण्यामागे…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July :- उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी पोलीस अधिकारी आणि पत्रकारांवर दबाव आणल्याचा धक्कादायक आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणी आम्ही गृहमंत्रालयाकडे याची तक्रार केल्यानंतर अमरावती पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचेही राणा यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची आरती सिंग यांचीही चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली आहे.

“हे प्रकरण दाबण्यामागे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा हात आहे. यासाठी त्यांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या आहेत. जेंव्हा एनआयएची टीम अमरावतीत पोहोचली, तेव्हा १२ दिवसांनी आरती सिंग यांनी मान्य केले, की उमेश यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या संदर्भात केलेल्या पोस्टमुळे झाली,” अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी कारवाईला उशीर का केला, यासंदर्भातही त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी सहा फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर सातवा आरोप नागपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नागपूरमधून सातव्या आरोपीला अटक केली आहे. शेख इरफान शेख रहिम (३२, कमेला ग्राऊंड, अमरावती) असे नागपूरहून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

The post नवनीत राणांचा गंभीर आरोप; हत्या प्रकरण दाबण्यामागे… first appeared on Zunjarneta live.

नवनीत राणांनी घेतली फडणवीस, राज्यपालांची भेट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Jun :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांची तर, राज्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. तसेच, विधान परिषद निवडणुकीत भाजप विजय मिळवेल. निवडणुकीत शिवसेनेची 50 टक्के मते भाजपला मिळतील, असा दावा भेटीनंतर नवनीत राणा यांनी केला.

राणा म्हणाल्या, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे कुशल नेतृत्व आणि योग्य नियोजनामुळे भाजपला यश मिळाले. विधान परिषद निडवणुकीत भाजप राज्यसभेपेक्षा मोठा विजय मिळवेल. विधान परिषदेत आमदारांचे मतदान हे गुप्त असते. शिवसेनेचे आमदारच मविआला कंटाळले आहेत. या निवडणुकीत भाजपला जास्त मते मिळावीत, ही शिवसेना आमदारांचीच इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेची 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपला मिळतील. या निवडणुकीनंतर राज्याच्या विधान परिषदेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनाविरोधात आम्ही पुर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत. शिवसेनेमुळे मुंबई आता भ्रष्टाचाराची लंका झाली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत जनताच शिवसेनेला उत्तर देईल. मुंबई पालिकेवरही भाजपचा झेंडा फडकेल, असे नवनीत राणा म्हणाल्या.

राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही घराबाहेर पडत नाही. त्यामुळे राज्यातील समस्यांबाबत त्यांना काहीही माहिती नसते. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे राज्यात नवीन उद्योगधंदे येत नाही. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढल्याची टीका नवनीत राणा यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, तेव्हाच त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या कळतील.

राहुल गांधी यांच्या ईडीचौकशी विरोधात आज राजभवनासमोर काँग्रेस नेते आंदोलन करणार आहेत. त्यावर टीका करत एखाद्या विभागाने लोकप्रतिनिधींकडे काही माहिती मागितली असेल तर ती माहिती देणे, ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. चौकशीचा सन्मान लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. संविधानासमोर सर्व समान आहेत. कोणाला विशेष वागणूक दिली जात नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या.

The post नवनीत राणांनी घेतली फडणवीस, राज्यपालांची भेट first appeared on Zunjarneta live.

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर राणा दाम्पत्याची टीका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Jun :- जे हनुमानाचे नाही झाले, ते प्रभू श्री रामाचे काय होणार?, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केली आहे. राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेला पुन्हा लक्ष्य केले.

महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी उद्धव ठाकरे नकार देतात. हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल केले जातात. महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वाचा अपमान करून शिवसेना आज अयोध्येत रामाच्या दर्शनाचे ढोंग करत आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. तसेच, उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह केल्यानंतर आम्हाला जम्मू-काश्मिरातील लाल चौकात हनुमान चालिसा म्हणण्याचे सांगण्यात आले. मात्र, हेच नेते आज अयोध्येत रामभक्तीचे ढोंग करत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जे काही पापा केले आहेत, ते धुवून काढण्यासाठीच शिवसेना अयोध्येत रामाचे दर्शन घेत आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. हनुमान भक्तींची ताकद राज्यसभा निवडणुकीत दिसून आली आहे. यापुढे विधान परिषद व मुंबई पालिकेतही आम्हा भक्तांची ताकद शिवसेनेला दिसेल. विधान परिषदेत मविआची 50 गुप्त मते भाजपला पडतील. या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव होईल, असे राणा म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यास नकार दिला आहे. मात्र, आम्ही त्यांना राज्यात हनुमान चालिसा म्हणायलाच लावू, असे यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. तसेच, आज राजद्रोहाच्या खटल्याप्रकरणी आमचा जामिन रद्द करावा, अशी मागणी सरकारकडून करण्यात येणार आहे. मात्र, आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा जामीन रद्द होणार नाही व राजद्रोहाचा खटलाच रद्द व्हावा, यासाठी आम्ही उच्च न्यायालयातही धाव घेणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.

The post शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर राणा दाम्पत्याची टीका first appeared on Zunjarneta live.