Narendra Modi - Zunjarneta live

भर कार्यक्रमात अजित पवारांचा मोदींना टोला! मी आईला भेटायला येतो, मात्र…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Sept :- मी सुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस, असे म्हणत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सध्या अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवार एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, मला काठेवाडीवरून मुंबईला पाठवले. गेलो ना तिथे. राहतोय ना तिथे. कधी म्हटलंय का मला राहायचे आहे. मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही. भेट घेतो आणि जातो. आताही ही सभा संपल्यावर आईला भेटायला जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

अखेर शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी संध्याकाळी राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ येत होते. सहा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेणारे काम कसं करणार? तरीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा, अशा खोचक शब्दात अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला.

यावेळी बारामतीमधील सहकारी संस्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जी जबाबदारी जनता आपल्यावर देईल. आपले वरिष्ठ आपल्यावर देतील. आपले सहकारी आपल्यावर देतील. आपले सभासद आपल्यावर देतील. त्यापद्धतीने तुम्हाला मला वागावच लागेल, असे ते म्हणाले.

The post भर कार्यक्रमात अजित पवारांचा मोदींना टोला! मी आईला भेटायला येतो, मात्र… first appeared on Zunjarneta live.

पंतप्रधान मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट?; ईडीचा मोठा दावा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी पीएफआयतर्फे घातक शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली जात होती, असेही ईडीने म्हटले आहे.

गुरुवारी केरळमधून पीएफआय सदस्य शफीक पायथ या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ईडीने वरील दावा केला आहे. या दाव्यानुसार यावर्षी १२ जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील रॅलीला लक्ष्य करण्याचा पीएफआयचा कट होता. याआधी इंडियन मुजाहिद्दीनसी संबंध असलेल्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये मोदी यांच्या पाटणा येतील रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

यासोबतच मागील काही वर्षांपासून पीएफआय तसेच पीएफआयशी संबंध असलेल्या संस्थांच्या खात्यामध्ये १२० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. यातील काही रक्कम देशातील तसेच काही परदेशी संशयास्पद स्त्रोतांकडून रोख स्वरुपात जमा करण्यात आली होती. ही रक्कम देशात दहशतवादी कृत्ये तसेच दंगली घडवण्यासाठी वापरण्यात येत होती, असा दावा ईडीने केला आहे.

दरम्यान, दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील १५ राज्यांत छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २०हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

The post पंतप्रधान मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट?; ईडीचा मोठा दावा first appeared on Zunjarneta live.

पृथ्वीराज चव्हाणांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप; वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हुकूमशाही…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Sept :- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हुकूमशाही पध्दतीने गुजरातला हलविण्यात आला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये आज पत्रकार परिषदेत केला. मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्त्व वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी गैर पद्धतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणत प्रकल्प गुजरातला नेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारची राज्याला जबर किंमत मोजावी लागणार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला की, 1 लाख 54 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव परिसरात येणार होता. प्रकल्प येणार हे जवळजवळ निश्चित झाले होते. तळेगावमध्ये कमी किमतीत जागाही उपलब्ध करून दिली जाणार होती. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला मोठ्या रकमेचे अनुदान मिळणार आहे. मात्र, अचानक चक्रे फिरली आणि गुजरात राज्यात प्रकल्प जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करत कंपनीवर दबाव आणून हा प्रकल्प गुजरातला नेला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये मरीन अ‍ॅकॅडमीला जमीन दिली होती. दुर्देवाने त्यानंतर सत्तांतर झाले आणि सत्तेवर आलेल्या भाजप नेतृत्वाने तो प्रकल्पही हायजॅक केला. त्यानंतर फणवणीस सरकारच्याच काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देखील महाराष्ट्रातून अहमदाबादला नेले. मोठे प्रकल्प गुजरातला नेऊन मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढविण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय फ्लाईटची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत अहमदाबादमध्ये फ्लाईट येत नाहीत. तरीही मुंबईतील प्रकल्प अहमदाबादला का नेले जात आहेत, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ठाणे, पालघर भागातून जाणार्‍या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला कसलाही फायदा होणार नसताना मोदींच्या हट्टापोटी हा प्रकल्प लादला गेला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बीकेसीसारख्या बिझनेस सेंटरमधील हजारो कोटींची जागा बुलेट ट्रेन स्टेशनसाठी दिली आहे. यामध्ये सरकारमधील काही जणांचा फायदा आहे. काही जणांच्या फायद्यासाठी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची जी मालिका सुरू आहे. त्या मालिकेतील वेदांता-फॉक्सकॉन हा तिसरा प्रकल्प आहे. हुकूमशाही पध्दतीने प्रकल्प गुजरातला हलविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारचा अशा पध्दतीने फटका महाराष्ट्राला बसतोय. मोदींचा आदेश आला की निमुटपणे तो पाळण्याचे काम माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री करतात.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही बंद केलेले उद्योगातील लायसन्स राज मोदींनी पुन्हा आणले आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणे ही महाराष्ट्रासाठी तोट्याची गोष्ट ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प अशा पध्दतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न यापुर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला नव्हता. त्यामुळे लोकांनी याबद्दल राज्यातल्या डबल इंजिन सरकारला जाब विचारला पाहिजे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेत्यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू होती. पुढे काय झाले, हे कळले नाही. परंतु, त्यांनी पक्ष जोडून भाजपमध्ये प्रवेश करणे ही दुर्देवी घटना आहे. पक्षांतरासाठी त्यांना काही अमिष दाखविण्यात आले आहे का, याची अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र, अशा गोष्टीमुळे लोकशाही धोक्यात येते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी काँग्रेस सोडणार, वेगळा निर्णय घेणार, अशा बातम्या कोण पेरतंय ते मला माहित नाही. मी काँग्रेसच्याच विचारांचा आहे, असे स्पष्ट करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशात लोकशाही धोक्यात आली असून काँग्रेस पक्षच लोकशाही वाचवू शकतो. पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष असावा, अशी आम्ही मागणी केली होती. सोनिया गांधींशी थेट संवाद होत नव्हता. वेळ मिळत नव्हती. म्हणून आम्ही पत्र लिहिले होते. ते पत्र कोणीतरी फोडले. त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. मात्र, ज्येष्ठ नेत्यांची मागणी मान्य करून निवडणूक जाहीर केल्यानंतर मी सोनिया गांधींचे आभार मी मानले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही. किंबहुना अध्यक्षपदाची निवडणूकही लढविणार नाही, असे स्पष्ट करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या घटनेनुसार निवडणूक व्हावी. लोकशाही पध्दतीने पक्ष चालावा, यासाठी कार्यकारिणीत नेमलेले लोक नसावेत, तर निवडून आलेले असावेत, अशी आमची भूमिका आहे. पक्ष मजबुतीने आणि लोकशाही पध्दतीने चालला पाहिजे. कारण, काँग्रेसच भाजपचा मुकाबला करू शकते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,​​​​​​​ राज्यात डबल इंजिन सरकार आहे. मात्र, अजुन पूर्ण मंत्रीमंडळ नाही. त्यामुळे पालकमंत्री नेमले नसावेत. आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीवर सुप्रीम कोर्ट देखील चालढकल करत आहे. तसेच 91 व्या घटना दुरूस्तीनुसार बंडखोर आमदार अपात्र ठरतील, असे मला वाटते. सरकारच राहणार नसल्यामुळे राज्यातील सरकारच्या हालचाली थंडावल्या.

The post पृथ्वीराज चव्हाणांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप; वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हुकूमशाही… first appeared on Zunjarneta live.

दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही! पवारांचे मोदी सरकारला खुले आव्हान
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 Sept :- शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराज हे कधीच दिल्लीसमोर झुकले नाहीत. बाजीराव पेशवे यांनी इथूनच दिल्लीला आव्हान दिले. पेशव्यांनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये तळ ठोकला होता. असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन होत आहे. राष्ट्रवादीचे हे आठवे अधिवेशन असून, शरद पवारांच्या उपस्थिती हे अधिवेशन पार पडत आहे. यासाठी देशभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक आणि हरियाणात ताकदीने पक्षविस्तार करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला यापूर्वी महाराष्ट्राबाहेर केरळ, लक्षद्वीप, गुजरात आणि झारखंडमधील निवडणुकांमध्ये काही जागांवर विजय मिळालेला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची राष्ट्रीय पक्ष ही ओळख प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर दोन दिवसांचे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शरद पवार हे आता पुढील चार वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शरद पवार यांना पुढील चार वर्षासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.

The post दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही! पवारांचे मोदी सरकारला खुले आव्हान first appeared on Zunjarneta live.

पंतप्रधान मोदींनी केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फुट उंच पुतळ्याचे अनावरण
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

​​​8 Sept :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटसमोरील सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचे उद्घाटन केले आहे. रात्री ठीक 7 वाजता ते कर्तव्य मार्गावर पोहोचले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले. हा कार्यक्रम 90 मिनिटे चालणार आहे. 19 महिन्यांच्या अखंड कामगिरीनंतर सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू तयार झाला आहे. उद्घाटनाच्या आदल्या दिवसांपर्यंत सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूवर काम सुरूच होते. एका पर्यवेक्षकाने सांगितले की काम लवकर पूर्ण करायचे होते. त्यामुळे मजूर 24 तास काम करीत होते. 9 सप्टेंबरपासून लोकांना येथे प्रवेश करता येणार आहे.

अपडेट्स :- 7.25 वाजता पीएम मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू ज्यांच्या परिश्रमाने उभा राहीला अशा कामगारांशी संवाद साधला.
अपडेट्स 7 वाजता :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन केले.

सेंट्रल व्हिस्टाच्या उद्घाटनामुळे गुरुवारी दुपारी 3 वाजेपासून दिल्ली उच्च न्यायालय तसेच पतियाळा हाऊस न्यायालय बंद राहणार आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) ताब्यात घेतली. उद्घाटनापूर्वी बाहेरील व्यक्तीला या परिसरात प्रवेश दिला जात नाहीये. केंद्रीय दलाशिवाय खासगी सुरक्षा रक्षकही लक्ष ठेवून आहेत. येथे फोटो काढण्यासही मनाई आहे. कडेकोट बंदोबस्तामुळे पर्यटक बॅरिकेड्सजवळ उभे राहून इंडिया गेट पाहण्याचा प्रयत्न करत राहिले.

खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका विक्रेत्याने सांगितले की, तीन वर्षे अत्यंत कठीण काळात गेली आहेत. परिसरात सर्वत्र काम सुरू होते. आता ते खूप सुंदर झाले आहे. आशा आहे की आणखी लोक येथे येतील आणि आमचा व्यवसाय चांगला चालेल. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, 90 मिनिटे चालेल. त्यासाठी आजूबाजूचे रस्ते सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जाणून घ्या पंतप्रधान मोदींचा मिनिटा-मिनिटाचा कार्यक्रम…

7:00 PM – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण 7:10 PM – इंडिया गेटला पोहोचतील पीएम 7:25 PM – कामगारांशी संवाद 7:30 PM – कर्तव्यपथाचे उद्घाटन 7:40 PM – स्टेजवर पोहोचतील पीएम 8:02 PM – पंतप्रधान मोदींचे भाषण

सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत 3.2 किमी पसरलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याची रचना डॉ. बिमल पटेल यांनी केली आहे. लाल ग्रॅनाइटपासून बनवलेल्या 15.5 किमीच्या पायवाटेपासून ते 16 पूल आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सपर्यंतची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सुमारे 20 महिन्यांनंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल. उद्घाटनाच्या आदल्या दिवसापर्यंत सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूवर काम सुरूच होते. एका पर्यवेक्षकाने सांगितले की बुधवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण करायचे आहे, त्यामुळे मजूर 24 तास कार्यरत आहेत. ९ सप्टेंबरपासून लोकांना येथे फिरता येणार आहे.

The post पंतप्रधान मोदींनी केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फुट उंच पुतळ्याचे अनावरण first appeared on Zunjarneta live.

शिक्षकदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Sept :- 5 सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. देशाचे राष्ट्रपती राधाकृष्णन हे स्वतः शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक असल्याने त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील 14500 शाळांना HighTech करण्याची योजना जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

“आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे – प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) या योजनेअंतर्गत भारतभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन करण्यात येईल. यात राष्ट्रीय शिक्षा धोरणाचे सर्व मॉडेल स्कूल होतील ज्यात NEP चे संपूर्ण आत्मा अंतर्भूत होईल.

PM-SHRI या योजना अतंर्गत असलेल्या शाळांमध्ये शिक्षण देण्याची आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण पद्धत असेल. तसेच अध्यापनाच्या शोधकेंद्रित शिक्षण पद्धतीवर भर दिला जाईल. इतकेच नव्हे तर याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि यासह बऱ्याच काही आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अलिकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. मला खात्री आहे की PM-SHRI शाळांचा NEP च्या भावनेने भारतातील लाखो विद्यार्थ्यांना आणखी फायदा होईल, असेही मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

The post शिक्षकदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा first appeared on Zunjarneta live.

पवारांचे मोदी सरकारवर टीकास्त्र! म्हणाले, ‘अच्छे दिन’ आले…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Aug :- राज्यात अनेक प्रश्न आहेत, राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. निवडणूकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना दिसले नाही. पुढच्या निवडणूकीच्या वेळी त्याचे विस्मरण झाले. आता 2024 साठी आता 5 ट्रीलियन इकॉनॉमी हे नवीन आश्वासन दिले जात आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

मी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. मी देखील काही निवडक जिल्ह्यात जात आहे. त्यांची सुरुवात मी आजपासून ठाण्यापासून केली आहे, असे त्यांनी सांगितले.

2022 पर्यंत प्रत्येकाजवळ हक्काचे पक्के घर असेल, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल, 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा असेल. डिजिटल इंडीयाचा नारा देण्यात आला होता. पण तसे झाले नाही. 2022 पर्यंत देशातील प्रत्येक घराला टॉयलेट उपलब्ध असेल हे आश्वासन देखील पूर्ण झाले नाही. 44 टक्के देशातील लोकांना अजुनही वीज मिळालेली नाही, ही आकडेवारी केंद्राची आहे, असे ते म्हणाले. यावेळी पवारांनी भाजपने दिलेल्या आश्वासनाची यादी देखील वाचून दाखवली

पुढे पवार यांनी सांगितले की, विरोधी पक्ष जर सत्तेत असतील तर त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. माणसे फोडणे, साधणांचा वापर करणे आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर चित्र आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा असे प्रकार झाले.

महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही लोक फोडले आणि सरकार स्थापन केले. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचे जे कृत्य सुरू आहे, त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी लढा उभा करण्याचा आम्ही विचार करत आहोत

महिलाच्या सुरक्षेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी यांचं 15 ऑगस्टच भाषण ऐकल, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले होते. पण, भाजपच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने त्यांना सोडले आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मोदींच्या राज्यात एका महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आले आहे. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे.

The post पवारांचे मोदी सरकारवर टीकास्त्र! म्हणाले, ‘अच्छे दिन’ आले… first appeared on Zunjarneta live.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा! “शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायचं सोडा….”
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Aug :- “देश २०२२मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. तोपर्यंत आमचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार”, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत या आश्वासनाचं काय झालं? असा प्रश्न विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पंतप्रधान मोदी यांचा एक जुना व्हिडीओ शेयर करत त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला केवळ आठ दिवस बाकी आहे, याची आठवणही या व्हिडीओतून करून देण्यात आली आहे.

“देशातल्या शेतकऱ्यांचे २०२२मध्ये उत्पन्न दुप्पट होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. उत्पन्न दुप्पट व्हायचे सोडाच. पण जे उत्पन्न आधी मिळत होते, ते देखील खत, बियाणे, अवजारे यांच्या महागाईमुळे मिळेनासे झाले.”, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी घोषणा केली होती. यासाठी २०१९मध्ये एक समितीही स्थापन करण्यात आली होती. तसेच या समितीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सात स्त्रोत सुचविले होते. त्यात पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्चात कपात करणे, पशुधनाची उत्पादकता वाढविणे, अधिक मूल्य असलेल्या पिकांची लागवड, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात वाढ करणे, पीक घनता वाढविणे आणि शेती व्यवसायातून इतर व्यवसायात स्थलांतर करणे, यांचा समावेश होता.

The post राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा! “शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायचं सोडा….” first appeared on Zunjarneta live.

BSNL साठी मोदी सरकारचे मोठे पॅकेज
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 July :- केंद्रीय मंत्रिमंडळाने BSNL साठी 1.64 लाख कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पॅकेजमध्ये तीन मुख्य घटक असतील, बीएसएनएल सेवांचा दर्जा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट असेल, त्याचा वापर तोटा कमी करण्यासाठी होईल आणि कंपनीची फायबर पोहोच वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल, अशीही माहिती वैष्णव यांनी दिली. या पॅकेजनंतर BSNL एआरपीयू 170-180 रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी 4G सेवांचा विस्तार करू शकेल, असेही वैष्णव यांनी सांगीेतले.

केंद्र शासनाच्या वतीने BSNL च्या पुनरुज्जीवनासाठी 1 लाख 64,156 कोटी रुपयांचे विशेष निधी मंजूर केला आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणाला देखील मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट समिती (CCEA) मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. या विलीनीकरणामुळे BSNL कडे आता देशभरात पसरलेल्या BBNL च्या 5.67 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण असणार आहे. आगामी तीन वर्षात बीएसएनएलसाठी 23 हजार कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याचवेळी, सरकार एमटीएनएलसाठी 2 वर्षांत 17,500 कोटी रुपयांचा निधी देणार आहे.

बीएसएनएल (भारत संचार निगम लिमीटेड) कंपनीच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विशेष पॅकेज जाहीर केले. त्यामुळे येत्या काळात बीएसएनएलची सेवा अधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. कारण, गेल्या काही वर्षांपासून बीएसएनल सेवेबाबत ग्राहकांकडून तक्रारी वाढलेल्या आपणास दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जात्मक सेवा देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने हे विशेष पॅकेज देण्यात आले.

बीएसएनएल सेवांचा दर्जा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट असेल. त्याचा ताळेबंद कमी करण्यासाठी वापरला जाईल.
कंपनीची फायबर पोहोच सेवा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
पॅकेजनंतर, BSNL एआरपीयू 170-180 रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी 4G सेवांचा विस्तार करू शकणार आहे.
BSNL साठी 4G आणि 5G सेवांच्या स्पेकट्रमला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
BBNL ने घातलेल्या फायबरचे नियंत्रण
केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, सरकारने बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड होण्यास मदत होणार आहे. BSNL चे 6.80 लाख किमी पेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे. त्याचवेळी BBNL ने देशातील 1.85 लाख ग्रामपंचायतींत 5.67 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकले आहे. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) द्वारे BBNL ने घातलेल्या फायबरचे नियंत्रण BSNL ला मिळणार आहे.

The post BSNL साठी मोदी सरकारचे मोठे पॅकेज first appeared on Zunjarneta live.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान सुरू:PM मोदी, शहा आणि योगींनी केले मतदान
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 July :- देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, पक्षांच्या पाठिंब्यानुसार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

राज्यांच्या विधानसभा आणि संसद भवनामध्ये मतदान होणार आहे. बॅलेट पेपरद्वारे मतदान होणार आहे. खासदारांना हिरवा, तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका मिळणार आहेत. गोपनीयता राखण्यासाठी, मतपत्रिका अनुक्रमांकाऐवजी रँडमली दिल्या जातील.

बंगालमध्ये क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून भाजपने आधी आमदारांना कोलकात्यातील हॉटेलमध्ये ठेवले, नंतर सर्वांना विधानसभेत आणून मतदान केले. क्रॉस व्होटिंग रोखण्याची जबाबदारी पक्षाने शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा आणि स्वपन मजुमदार यांच्यावर सोपवली आहे. येथे, यूपीमधील समाजवादी पक्षाचे आमदारही क्रॉस व्होटिंग करू शकतात.

The post राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान सुरू:PM मोदी, शहा आणि योगींनी केले मतदान first appeared on Zunjarneta live.