India - Zunjarneta live

मोठी बातमी! मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गंभीर; आयसीयूत केलं शिफ्ट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Oct :- समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मुलायम सिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती जास्ता खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे.

मुलायम सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर काही दिवसांपासून मेदांता रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. पण त्यांची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे त्यांना आयसीयूत शिफ्ट करण्यात आलं. यावेळी त्यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव आणि मुलगा प्रतिकदेखील सोबत होता.

पिता मुलायम सिंह यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती मिळताच यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव पत्नी डिंपल यादवसह मेदांता रुग्णालयात पोहोचले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलायम सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांना तीन महिन्यांपूर्वीच मेदांता रुग्णालयात घेवून आले होते.

मेदांता रुग्णालयात पूर्ण चेकअप केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती आज सकाळपर्यंत ठीक होती. पण दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लगला. त्यामुळे त्यांना तातडीने मेदांता रुग्णासयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यांचं ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन लेव्हल आधीपासूनच कमी झालं होतं.

The post मोठी बातमी! मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गंभीर; आयसीयूत केलं शिफ्ट first appeared on Zunjarneta live.

वाहनांना 6 एअरबॅग अनिवार्यचा निर्णय लांबणीवर; केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Sept :- केंद्र सरकारने प्रवासी कारसाठी सहा-एअरबॅग अनिवार्य नियमाची अंमलबजावणी पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज याबाबत घोषणा केली. जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांमुळे सहा एरअर बॅग निर्देश पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

हा नियम आता १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने आठ आसनी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज बसवणे बंधनकारक केले होते. हा आदेश १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार होता.

“वाहन उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा आर्थिक परिस्थितीवर होणारा व्यापक परिणाम लक्षात घेऊन, ०१ ऑक्टोबर २०२३ पासून प्रवासी कारमध्ये किमान सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” असं ट्वीट करून नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

सहा एअर बॅगचा निर्णय घेताना गडकरी म्हणाले होती की, आम्ही कारमध्ये किमान सहा एअर बॅग उपलब्ध करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवू इच्छितो, यासाठी वाहन उद्योगासह सर्व पक्षांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

The post वाहनांना 6 एअरबॅग अनिवार्यचा निर्णय लांबणीवर; केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती first appeared on Zunjarneta live.

बुमराहची T-20 विश्वचषकातून माघार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Sept :- ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकणार आहे. तो पूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यांना बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील. बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्येही तो संघाचा भाग नव्हता.

सरावाच्या वेळी त्याने पाठदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर संघाच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या सांगण्यावरून त्याला पहिल्या T20 सामन्यातून वगळण्यात आले होते. या दुखापतीमुळे तो आशिया कपही खेळू शकला नाही.

जसप्रीत बुमराह संपूर्ण आशिया कपमधून बाहेर होता. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन केले होते. येथेही तो पहिला सामना खेळू शकला नाही. त्याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने यॉर्कर चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला बोल्ड केले होते. ज्यानंतर फिंचने स्वतः त्याचे कौतुक केले. त्याच्या पुढच्या सामन्यात भारतासाठी तो चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 4 षटकात 50 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा झाल्यापासून टीम इंडियाचे टेन्शन वाढत आहे. सर्वात आधी रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर दीपक हुडालाही नुकतीच दुखापत झाली होती, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतून त्याने माघार घेतली होती. आता जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे विश्वचषकात भारताच्या अडचणीत वाढ होणार आहे.

आशिया चषकापासूनच डेथ ओव्हर्समध्ये संघाची गोलंदाजी खूपच खराब दिसून आली आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार 18व्या आणि 19व्या षटकात चांगलाच महागडा ठरला. अशा परिस्थितीत बुमराहच्या आगमनाने संघाची ही समस्या दूर होईल, अशी अपेक्षा होती, मात्र दुखापतीमुळे हा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहल.

The post बुमराहची T-20 विश्वचषकातून माघार first appeared on Zunjarneta live.

देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान २०२१ साली लष्करातून निवृत्त झालेले आहेत. देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून संरक्षण दल प्रमुख हे पद रिक्त होते. दरम्यान केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जनम १८ मे १९६१ रोजी झाला. त्यांच्याकडे १९८१ लाव ११ गोरखा रायफल्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यांनी मेजर जनरल पदावर अताना बारामुला भागात इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले होते. पुढे लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भागात नेतृत्व केले. त्यांच्याकडे ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. निवृत्त होईपर्यंत म्हणजेच मे २०२१ पर्यंत त्यांच्यावर ही जबाबदारी होती.

अनिल चौहान (निवृत्त) यांना लष्करातील परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे.

याआधी तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण दल प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपिन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली होती. जनरल रावत हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले होते. त्याच दिवशी त्यांनी संरक्षण दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. संरक्षण दल प्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वर्षे ही वयोमर्यादा आहे.

The post देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती first appeared on Zunjarneta live.

काँग्रेसकडून RSSवर बंदी घालण्याची मागणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर बंदी घालण्यात आल्यानंतर काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी वादग्रस्त विधान केले आहे. PFIप्रमाणे RSSवरही बंदी घालावी, अशी मागणी सुरेश यांनी केली आहे. सुरेश पुढे म्हणाले- संघही संपूर्ण देशात हिंदू जातीयवाद पसरवण्याचे काम करत आहे, ते PFIसारखेच आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही बंदी घालावी.

काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही 2018 मध्ये RSSविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत. झाबुआमध्ये दिग्विजय सिंह म्हणाले होते की, आतापर्यंत समोर आलेले सर्व हिंदू दहशतवादी RSSशी संबंधित आहेत. संघाची चौकशी करून कारवाई करावी, असेही ते म्हणाले होते.

PFIवरील बंदीनंतर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट केले आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले – बाय बाय PFI. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले- PFIवर बंदी घालण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. भारताविरुद्ध फुटीरतावादी किंवा विघटनकारी रचनेचा कठोरपणे सामना केला जाईल याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

12 सप्टेंबर रोजी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवर जळणाऱ्या खाकी चड्डीचा फोटो शेअर केला होता. त्यात लिहिले आहे- देशाला द्वेषमुक्त करण्यासाठी 145 दिवस उरले आहेत. मात्र, संघानेही त्याला तत्काळ विरोध केला आणि संघाचे सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी म्हटले की, तुमच्या वडिलांनी आणि आजोबांनी संघाचा खूप तिरस्कार केला होता, पण संघ थांबला नाही.

स्वातंत्र्यानंतर भारतात संघावर 3 वेळा बंदी लागली होती. गांधीजींच्या हत्येनंतर 1948 मध्ये पहिल्यांदा बंदी घालण्यात आली. ही बंदी सुमारे 2 वर्षे टिकली. 1975 मध्ये अंतर्गत आणीबाणीच्या काळात संघावर दुसरी बंदी घालण्यात आली. आणीबाणी संपल्यानंतर बंदी उठवण्यात आली. 1992 मध्ये बाबरी विध्वंसाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिसऱ्यांदा बंदी घालण्यात आली होती. सुमारे 6 महिन्यांसाठी ही बंदी घालण्यात आली होती.

RSS ची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये केली होती. सरसंघचालक हे संघातील सर्वात प्रमुख पद आहे. एका अहवालानुसार एक कोटीहून अधिक प्रशिक्षित सदस्य आहेत. संघ परिवारात 80 पेक्षा जास्त समविचारी किंवा संलग्न संघटना आहेत. संघ जगातील सुमारे 40 देशांमध्ये सक्रिय आहे.

सध्या संघाच्या 56 हजार 569 दैनंदिन शाखा आहेत. तसेच सुमारे 13 हजार 847 साप्ताहिक मंडळे आणि 9 हजार मासिक शाखा आहेत. संघात सरकार्यवाह या पदासाठी निवडणूक होते. संचालनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असते.

The post काँग्रेसकडून RSSवर बंदी घालण्याची मागणी first appeared on Zunjarneta live.

पंतप्रधान मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट?; ईडीचा मोठा दावा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी पीएफआयतर्फे घातक शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली जात होती, असेही ईडीने म्हटले आहे.

गुरुवारी केरळमधून पीएफआय सदस्य शफीक पायथ या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ईडीने वरील दावा केला आहे. या दाव्यानुसार यावर्षी १२ जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील रॅलीला लक्ष्य करण्याचा पीएफआयचा कट होता. याआधी इंडियन मुजाहिद्दीनसी संबंध असलेल्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये मोदी यांच्या पाटणा येतील रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

यासोबतच मागील काही वर्षांपासून पीएफआय तसेच पीएफआयशी संबंध असलेल्या संस्थांच्या खात्यामध्ये १२० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. यातील काही रक्कम देशातील तसेच काही परदेशी संशयास्पद स्त्रोतांकडून रोख स्वरुपात जमा करण्यात आली होती. ही रक्कम देशात दहशतवादी कृत्ये तसेच दंगली घडवण्यासाठी वापरण्यात येत होती, असा दावा ईडीने केला आहे.

दरम्यान, दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील १५ राज्यांत छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २०हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

The post पंतप्रधान मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट?; ईडीचा मोठा दावा first appeared on Zunjarneta live.

आयसीसीची मोठी घोषणा! क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Sept :- ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे. यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासोबतच कोविड-१९ च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मांडल्या आहेत. साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते. असेच काहीसे यावेळीही पाहायला मिळाले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीने एमसीसी मधील २०१७ च्या क्रिकेट नियमांच्या अद्ययावत तिसऱ्या आवृत्तीतील खेळण्याच्या अटींमध्ये बदल करण्याची शिफारस केली.

खेळाडू चेंडूवर थुंक लावू शकणार नाहीत. हा नियम गेल्या दोन वर्षांपासून लागू असून भविष्यातही तो कायम राहणार आहे. फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. बाद झालेल्या फलंदाजाच्या बाजू (क्रीज) बदलण्यानं किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेल बाद होण्यापूर्वी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा.

मर्यादित आणि कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी२० मध्ये त्याची वेळ मर्यादा ९० सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार वेळ संपल्याची (टाईम आऊटची) मागणी करण्यास पात्र असेल.

गोलंदाजी करताना चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू अवैध (नो-बॉल) ठरवला जाईल.
गोलंदाजीसाठी धावण्याच्या दरम्यान, क्षेत्ररक्षणाच्या बाजूने कोणत्याही प्रकारची अनुचित कृती केल्यास, पंच त्या चेंडूला डेड बॉल तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड देऊ शकतात.

जर गोलंदाजानं गोलंदाजी करण्यापूर्वी साथीदार फलंदाज (नॉन-स्ट्रायकर) क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजानं फलंदाजाला धावबाद केल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल. यापू्र्वी असं केल्यास फलंदाजावर अन्याय झाला असं मानलं जायचं. टी२० प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या आत अतिरिक्त एक खेळाडू ठेवावा लागेल.

The post आयसीसीची मोठी घोषणा! क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल first appeared on Zunjarneta live.

चिनी सैन्याची पूर्व लडाखमधून 3 KM माघार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 Sept :- चिनी लष्कराने पूर्व लडाखमधील कळीच्या गोगरा-हॉटस्प्रिंगमधून 3 किमी लांब माघार घेतली आहे. हा खुलासा मॅक्सार टेक्नोलॉजीने जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांतून झाला आहे. मे 2020 पासून दोन्ही देशांचे सैन्य या भागांतील पेट्रोलिंग पॉइंट-15 जवळ एकमेकांपुढे ठाण मांडून बसले होते. यामुळे दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला होता.

गत 17 जुलै रोजी भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांत कोअर कमांडरस्तरीय चर्चेची 16 वी फेरी झाली. त्यात 8 सप्टेबर 2022 रोजी कळीच्या ठिकाणावरून सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले. या अंतर्गत दोन्ही देशांच्या लष्कराने सुनियोजितपणे पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्जमधून (पीपी-15) माघार घेतली.

सॅटेलाइट छायाचित्रांत दिसून येते की, एक वर्षापूर्वी 12 ऑगस्ट 2021 रोजी डिसएंगेजमेंटपूर्वी गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात चीनची एक लष्करी पोस्ट दिसून येत आहे. पण नव्या छायाचित्रात ती त्या ठिकाणी दिसत नाही. या प्रकरणी दोन्ही देशांतील सहमतीनुसार यापुढे या भागात दोन्ही देशांचे सैन्य पेट्रोलिंग करणार नाही.

यापूर्वीच्या सॅटेलाइट फोटोत चिनी लष्कराने एलएसीच्या अलिकडील भारतीय हद्दीत एक इमारत बांधल्याचे दिसून येत होते. चीनच्या 2020 च्या घुसखोरीपूर्वी भारतीय लष्कर या भागात नियमित गस्त घालत होते. दुसरीकडे, 15 सप्टेबर 2022 च्या उपग्रहीय छायाचित्रांत ही इमारत त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे चीनने ही पोस्ट दुसऱ्या भागात हलवल्याचे स्पष्ट होत आहे.

लडाखमधील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मते, चीनसोबतच्या तडजोडींतर्गत भारतीय लष्करानेही भारतीय हद्दीतील आपली पोस्ट अलीकडे घेतली आहे. पण दिल्लीतील लष्करी अधिकाऱ्यांनी त्याची पुष्टी केली नाही. लडाखच्या चुशूल क्षेत्राचे नगरसेवक कोंचोक स्टेनजिन यांनी एनडीटीव्हीला बोलताना सैनिकांनी केवळ पेट्रोलिंग पॉइंट 15च (पीपी-15) नव्हे तर पीपी-16 वरूनही माघार घेतल्याचा दावा केला आहे.

या भागात भारतीय सैनिक मागील 50 वर्षांपासून नियमित गस्त घालत होते. पण आता हा भाग बफर झोन बनला आहे. या भागात हिवाळ्यात भारताची गुरेढोरे चारली जात होती. दुसरीकडे, दोन्ही देशांच्या लष्करात डेमचोक व देपसांग भागातील वादावरही तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चीनने एप्रिल-मे 2020 मध्ये लष्करी सरावाच्या नावाखाली सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या होत्या. भारतानेही या भागात चिनी सैनिकांएवढेच सैन्य तैनात केले होते. त्यानंतर स्थिती एवढी बिकट झाली की 4 दशकांहून अधिक काळानंतर एलएसीवर गोळीबार झाला होता. त्यात 15 जून रोजी गलवान घाटीत चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते.

The post चिनी सैन्याची पूर्व लडाखमधून 3 KM माघार first appeared on Zunjarneta live.

गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती; मुकेश अंबानी 8 व्या स्थानी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Sept :- भारतीय उद्योगपती गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची संपत्ती 154.7 अब्ज डॉलर (सुमारे 12.34 लाख कोटी रुपये) आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांनी फ्रा​​​​​​न्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून द्वितीय स्थान मिळविले आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या सूचीमध्ये टॉप-2 मध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रँकिंगमध्ये गौतम अदानी आता फक्त एलन मस्क यांच्या मागे आहेत. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांची 21.83 लाख कोटी ($273.5 अब्ज) संपत्तीसह या यादीत अव्वल स्थानावर आहेत. 12.27 लाख कोटी ($ 153.8 अब्ज) संपत्तीसह बर्नार्ड अरनॉल्ट तिसरे आणि जेफ बेझोस 11.95 लाख कोटी ($ 149.7 अब्ज) संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

अदानी व्यतिरिक्त रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे श्रीमंताच्या टॉप-10 यादीत स्थान मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे 7.35 लाख कोटी ($92.1 अब्ज) संपत्तीसह जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

17 दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या स्थानी आले होते. केवळ 2022 मध्ये अदानींनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये $78.2 अब्जची भर घातली आहे. हे कोणत्याही व्यावसायिकापेक्षा 5 पट जास्त आहे. त्यांनी फेब्रुवारीत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सर्वात आशियातील सर्वात श्रीमंत व्य़क्ती म्हणून मागे टाकले होते.

गौतम अदानी हे 4 एप्रिल रोजी सेंटबिलियनर्स क्लबमध्ये सामील झाले होते. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंट अब्जाधीश म्हणतात. एक वर्षापूर्वी, एप्रिल 2021 मध्ये अदानींची एकूण संपत्ती $ 57 अब्ज होती. 2021-2022 या आर्थिक वर्षात अदानीची एकूण संपत्ती जगातील सर्वात वेगाने वाढली आहे. अदानी समूहाच्या सात सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्या आहेत.

अदानी समूह त्याच्या उपकंपनी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCPL) मार्फत NDTV ची प्रवर्तक कंपनी RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​99.99% शेअर्स खरेदी करू इच्छित आहे. मात्र, काही कायदेशीर कारणांमुळे हे प्रकरण प्रलंबित आहे.

The post गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती; मुकेश अंबानी 8 व्या स्थानी first appeared on Zunjarneta live.

रॉबिन उथप्पाचा क्रिकेटला रामराम…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 Sept :- भारतीय संघाचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याने ही माहिती दिली आहे. उथप्पाने 15 एप्रिल 2006 रोजी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंदूरमधील पदार्पणाच्या सामन्यात रॉबिनने सलामी करताना 86 धावांची खेळी केली. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला होता.

उथप्पाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 14 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याच वेळी, तो आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. आता तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. रॉबिन उथप्पाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी 20 वर्षांपासून प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे. मला भारत आणि माझे राज्य कर्नाटकसाठी खेळण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. माझा प्रवास खूप सुंदर होता. काही चढ-उतारही आले, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतो. त्यामुळेच मी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उथप्पाने पुढे लिहिले की, ‘मी मुंबई इंडियन्स, आरसीबी, पुणे आणि राजस्थानचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. तसेच कोलकाता आणि चेन्नईचा संघ माझ्यासाठी खूप खास आहे. ज्याने आयपीएल दरम्यान माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेतली.’

उथप्पा 2007 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हा विश्वचषक जिंकला. रॉबिनने पाकिस्तानविरुद्ध टाय सामन्यानंतर जेव्हा बॉल-आउट झाले होते, तेव्हा त्याने सेहवाग आणि हरभजनसोबत थ्रो केला. त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळाला होता.

उथप्पाने भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 6 अर्धशतकांच्या बळावर एकदिवसीय सामन्यात 934 धावा केल्या. तर T20 मध्ये त्याने 1 अर्धशतकासह 249 धावा केल्या होत्या. याशिवाय उथप्पाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 27.51 च्या सरासरीने आणि 130.55 च्या स्ट्राईक रेटने 4952 धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये 27 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 88 धावा आहे.

The post रॉबिन उथप्पाचा क्रिकेटला रामराम… first appeared on Zunjarneta live.